रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या

By नितीन पंडित | Published: September 9, 2023 07:57 PM2023-09-09T19:57:19+5:302023-09-09T19:57:38+5:30

भिवंडीत विवाहितेचा छळ

A married woman committed suicide after not being allowed to go to her brother's house on Rakshabandhan | रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या

रक्षाबंधन सणाला भावाच्या घरी जाऊ न दिल्याने विवाहितेने केली आत्महत्या

googlenewsNext

भिवंडी: विवाहितेने लग्नात आपल्या माहेरून पतीसाठी मोटर सायकल आणली नाही यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या पती व सासरच्या मंडळींनी रक्षाबंधन सणाला विवाहितेस भावाच्या घरी जाऊन न दिल्याने व सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी शांतीनगर पोलीस ठाण्यास पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 कविता सुनील गौड असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. कविता हीचा विवाह सुनील सोबत झाला असताना तिचा पती सुनिल,सासरे रामअवतार,
सासु लिलावतीदेवी,दिर सुधिर,नणंद गुंजन यांनी आपसात संगनमत करून कविता हिने पती साठी माहेरहून मोटार सायकल आणली नाही याचा राग मनात ठेऊन तुझे वडिल व भाऊ भिकारी आहेत,तुला घरातील कामे व्यवस्थीत करता येत नाही असे सतत टोमणे मारून तिच्या सोबत शिवीगाळ व मारहाण करून तिचा सतत शारीरीक व मानसीक छळ सुरू केला होता.

त्यातच रक्षाबंधन सणासाठी भावाच्या घरी जाण्यास सासु सासरे यांनी कविता हिस नकार दिल्याने,अखेर या सर्व त्रासाला कंटाळून कविता हिने भादवड येथील घरात बेडरूम मधील छताचे लोखंडी हुकास गळफास घेवुन आत्महत्या केली .या बाबत मयत कविता हीचा भाऊ भरतकुमार याने दिलेल्या तक्रारी वरून शांतीनगर पोलिस ठाण्यात पती सुनिल, सासरे रामअवतार,सासु लिलावतीदेवी, दिर सुधिर, नणंद गुंजन यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A married woman committed suicide after not being allowed to go to her brother's house on Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.