भिवंडीत प्लास्टिक मणी कारखाण्याला भीषण आग
By नितीन पंडित | Published: August 29, 2023 05:54 PM2023-08-29T17:54:29+5:302023-08-29T17:54:40+5:30
या आगीचे नेमकी कारण समजले नाही.
भिवंडी: तालुक्यातील कांबे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका प्लास्टिक मणी बनवणाऱ्या कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून सुदैवाने जीवित झाली नाही. या आगीचे नेमकी कारण समजले नाही.
कांबे ग्रामपंचायत हद्दीत तळवली नाका मिठपाडा या भागात असलेल्या एका बंद गोदामातून धूर बाहेर निघू लागल्या नंतर या आगीची माहिती येथील नागरिकांना मिळाली.कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल साठवलेला असल्याने आगीने उग्र रूप धारण केले. त्यामध्ये कारखान्या च्या छताचे पत्रे देखील तुटून पडले.
भिवंडी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने अवघ्या एका तासात आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.दरम्यान आगीचे कारण समजले नाही.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली होती त्या बाजूचे शटर बंद असल्याने कारखान्यातील कामगारांनी दुसऱ्या गाळ्यातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली आहे .