ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर टोळक्याचा हल्ला

By जितेंद्र कालेकर | Published: December 26, 2023 10:06 PM2023-12-26T22:06:11+5:302023-12-26T22:06:20+5:30

वाहनाच्या काचाही फोडल्या

A mob attacked the house of former Shiv Sena Shinde group corporator Manik Patil in Thane: The windows of the vehicle were also broken. | ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर टोळक्याचा हल्ला

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर टोळक्याचा हल्ला

ठाणे: शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हल्लेखोर हे गल्लीतले चोर असून याप्रकरणी कासारवडली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

पाटील यांच्या घरात सुरुवातीला एका अज्ञात हल्लेखोराने दारुच्या नशेत शिरकाव केला. त्याने त्यांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी पाटील हे घरात विश्रांती घेत होते. हल्लेखोरांनी आपल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या असून घरावरही दगडफेक केली आहे. हा हल्ला करण्यामागे त्यांचा खंडणीसाठी किंवा धमकावण्याचा उद्देश होता, हे काहीच कळू शकले नाही.

ते गल्लीतले चोर असून त्यांची नावे आपण उघड करणार नाही. या हल्ल्यात दारुच्या बाटल्याही फोडल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात पाटील यांनी तक्रार दाखल केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A mob attacked the house of former Shiv Sena Shinde group corporator Manik Patil in Thane: The windows of the vehicle were also broken.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.