भिवंडीतील शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर चिखलाचे साम्राज्य; नागरिक हैराण
By नितीन पंडित | Published: July 11, 2024 07:07 PM2024-07-11T19:07:14+5:302024-07-11T19:08:08+5:30
याबाबत नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेक वेळा तक्रारी निवेदने सादर केली असतानाही मनपा प्रशासनाने रहिवाशांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याने पावसाळ्यात शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड चिखल साचले आहे.ज्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे.
भिवंडी: शहरातील कामतघर ताडाळी येथील शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत माती भराव केल्याने कॉलनी बाहेरील गटर तुंबल्याने गटाराचे पाणी शिक्षक कॉलनी शिरत असल्याने शिक्षक कॉलनीतील शिक्षकांसह रहिवाशांना येता जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून चिखल तुडवतच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
याबाबत नागरिकांनी महापालिका मुख्यालयात अनेक वेळा तक्रारी निवेदने सादर केली असतानाही मनपा प्रशासनाने रहिवाशांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याने पावसाळ्यात शिक्षक कॉलनीच्या प्रवेशद्वारावर प्रचंड चिखल साचले आहे.ज्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे.
महापालिकेकडे अनधिकृत माती भराव करणाऱ्या बांधकाम व्यावसायिका विरोधात तक्रार केली आहे. मात्र मागील दोन वर्षापासून आमच्या या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांकडून देण्यात येत आहे.