भिवंडीत नर्स चालवीत असलेले हॉस्पिटल केले सिल बंद
By नितीन पंडित | Published: April 20, 2023 06:15 PM2023-04-20T18:15:37+5:302023-04-20T18:16:35+5:30
भिवंडी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वा खाली आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांच्या तक्रार निवारण समितीने शहरातील रुग्णालयांची नोंदणी कागदपत्र तपासणी सुरु करून कारवाईचा बडगा उचलला आहे.
भिवंडी- भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार, मजूर वस्ती असल्याने त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर झोपडपट्टी परिसरात थेट रुग्णालय थाटून बसले आहेत. भिवंडी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वा खाली आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड ,वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांच्या तक्रार निवारण समितीने शहरातील रुग्णालयांची नोंदणी कागदपत्र तपासणी सुरु करून कारवाईचा बडगा उचलला आहे.
भिवंडी कल्याण रोड वरील आनंद हॉटेलच्या मागील बाजू कडील शास्त्री नगर येथील एका इमारतींमध्ये हयात हॉस्पिटल ची तपासणी केली असता तेथे नजमा सय्यद या नर्स कडून हे हॉस्पिटल मागील एक वर्षांपासून चालवले जात असल्याचे समोर आले. त्यांच्या कडे पथकाने मागणी केली असता कोणतेही रुग्णालय नोंदणी प्रमाणपत्र अथवा शैक्षणिक अहर्ता आढळून न आल्याने डॉ जयवंत धुळे यांनी पालिका व पोलिस पथकासह हयात रुग्णालयावर कारवाई करून ते सीलबंद केले व हॉस्पिटल चालक नजमा सय्यद या नर्स महिलेकडे कोणतेही प्रमाणपत्र नसताना नागरिकांवर वैद्यकीय उपचार करीत असल्याने तिच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरात बोगस डॉक्टर व नोंदणी नसलेल्या रुग्णालयां वर कठोर कारवाईचे आदेश पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिले असून या पुढे ही शहरातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर्स व बोगस रुग्णालयांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिला आहे.