ठाण्यात दीड वर्षाच्या मुलाची बंद घरातून सुखरूप सुटका, स्वत: दरवाजाची कडी लावल्याने अडकला
By जितेंद्र कालेकर | Published: October 31, 2022 06:29 PM2022-10-31T18:29:42+5:302022-10-31T18:29:42+5:30
खेवरा सर्कल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या नायडेन बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरील १२ क्रमांकाच्या सदनिकेत दया विश्वकर्मा यांचा दीड वर्षांच्या नयन याने स्वत: दरवाजाची कडी लावली.
ठाणे:
खेवरा सर्कल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या नायडेन बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरील १२ क्रमांकाच्या सदनिकेत दया विश्वकर्मा यांचा दीड वर्षांच्या नयन याने स्वत: दरवाजाची कडी लावली. ती कडी त्याला परत काढता न आल्याने तो या खोलीमध्ये अडकला होता. यावेळी, स्थानिक रहिवाशांनी लोखंडी पारीच्या सहाय्याने कडी तोडून या मुलाची सुटका केली. हा प्रकार सोमवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
हा मुलगा अडकल्याची माहिती माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह दाखल झाले होते. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच स्थानिकांनी दरवाजाची कडी तोडून नयनची सुखरूप सुटका केली. तसेच त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.