भिवंडीत तुटलेल्या लोखंडी चेंबर मध्ये अडकला पादचाऱ्याचा पाय
By नितीन पंडित | Published: June 18, 2024 05:50 PM2024-06-18T17:50:36+5:302024-06-18T17:51:25+5:30
सोमवारी नाले सफाई नंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरात तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबर मध्ये एका स्थानिक नागरिकांचा पाय अडकून पडला होता.
भिवंडी: शहरात अनेक गटार व नाल्यावरील लोखंडी चेंबर तुटलेल्या अवस्थेत असून या चेंबरची दुरुस्ती कधी केली जात नाही. ते तुटलेल्या अवस्थेतच गटारी वर टाकले जातात. सोमवारी नाले सफाई नंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरात तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबर मध्ये एका स्थानिक नागरिकांचा पाय अडकून पडला होता.
भानुदास कळसे असे या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून, स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर त्याचा पाय बाहेर काढला. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पालिका कर्मचारी व नाले सफाई ठेकेदार या विरोधात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.