ठाणे स्थानकाची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला; एका जखमीवर कळव्यात उपचार सुरू
By अनिकेत घमंडी | Updated: June 28, 2024 17:21 IST2024-06-28T17:20:52+5:302024-06-28T17:21:00+5:30
लोकल सेवा सुरू असली तरी २० मिनिटे विलंबाने धावल्याने संध्याकाळी घरी परतताना चाकरमान्यांचे हाल झाले.

ठाणे स्थानकाची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला; एका जखमीवर कळव्यात उपचार सुरू
ठाणे: ठाणे स्टेशन पश्चिम बाजू किमी नंबर 33/8 ते किमी नंबर ३३/११२बीजवळ कल्याण दिशेकडील भागात रेल्वेची संरक्षक भिंतीचा काही भाग दुपारी १२वा. सुमारास अचानक कोसळला.
ही घटना ठाणे शहर पोलीस हद्दीत झाली असून त्यामध्ये एक इसम नरेश कोळी(६२) हे जखमी झाले असून त्यांना कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे उपचारी साठी ठाणे नगर पोलिस ठाणे कडून पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटना घडतात त्या ठिकाणी लोहमार्ग पोलीस, महानगर पालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाकडून स्टेशन प्रबंधक केशव तावडे, वरिष्ठ अभियंता ठाणे रेल्वे, तसेच आपत्ती व्यवस्थापन आदींनी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगण्यात आले. सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून लहान मोठ्या सरी पडत आहेत, लोकल सेवा सुरू असली तरी २० मिनिटे विलंबाने धावल्याने संध्याकाळी घरी परतताना चाकरमान्यांचे हाल झाले.