ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

By जितेंद्र कालेकर | Published: August 4, 2023 11:08 PM2023-08-04T23:08:32+5:302023-08-04T23:08:42+5:30

कासारवडवली येथून २५ ते २७ प्रवासी घेऊन घोडबंदर रोडने कोपरीकडे ही खासगी बस निघाली होती. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर त्या बसचा अपघात झाला.

A private bus hit a street pole in Thane; 12 passengers injured | ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

ठाण्यात स्ट्रीट पोलला खासगी बसची जोरदार धडक; १२ प्रवासी जखमी

googlenewsNext

ठाणे: पातलीपाडा उड्डाणपुलावरून घोडबंदर कडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर एका खासगी बसने उड्डाणपुलालगत असलेल्या स्ट्रीट पोलला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत २७ प्रवाशांपैकी १२ प्रवासी जखमी झाले आहेत.  त्यांच्यापैकी आठ जणांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. तर उर्वरित तिघांवर शासकीय तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कासारवडवली येथून २५ ते २७ प्रवासी घेऊन घोडबंदर रोडने कोपरीकडे ही खासगी बस निघाली होती. याचदरम्यान पातलीपाडा उड्डाणपुलावर त्या बसचा अपघात झाला. ही माहिती मिळताच घटनास्थळी िचतळसर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, विद्युत आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या १२ जणांना स्थानिकांनी  तसेच बसमधील प्रवाशांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

अपघातग्रस्त बस क्रेन मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली. बस बाजूला केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आला. बसने स्ट्रीट पोलला धडक दिल्याने स्ट्रीट पोल धोकादायक स्थितीत आहे. किरकोळ जखमी झालेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकाच्या  हाताला तर दुसऱ्याचा गुडघ्याला फॅक्चर झाले आहे. अन्य एकाला त्याच्या नातेवाईकांनी  खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

अपघातामधील जखमींची नावे  
या अपघातामध्ये रीचा पाठक (२५), हर्षल पाटील (३०), अफसर अली (२२ ) , नीरज गुप्ता (२०) , श्रावणी पाटील (१५ ) , सुक्रिन पाटील ( ५०) , अंकिता सिंग (२२), सुदर्शन साबर ( २३ ), स्वप्नील पांचाळ (३०), ओमप्रकाश कुशवा (४७) , प्राजक्ता पंडित ( २३ ), श्रीधर पोठ (२३) अशी जखमींची नावे आहेत.
 

Web Title: A private bus hit a street pole in Thane; 12 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे