आनंद दिघेंचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का? मीनाक्षी शिंदेंचा सवाल

By अजित मांडके | Published: June 9, 2023 05:01 PM2023-06-09T17:01:23+5:302023-06-09T17:04:59+5:30

आमदारकी मिळविण्यासाठी हे नाटक सुरु असल्याची टीका ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केली.

A single mention of Anand Dighe, why is the leader of the thackeray group silent? Question by Meenakshi Shinde | आनंद दिघेंचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का? मीनाक्षी शिंदेंचा सवाल

आनंद दिघेंचा एकेरी उल्लेख, उबाठा गटाचे नेते गप्प का? मीनाक्षी शिंदेंचा सवाल

googlenewsNext

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आनंद दिघे यांचा एकेरी उल्लेख करीत, लोकांमध्ये दिघेंबाबत संभ्रमाच्या गोष्टी पसरवत आहे, असे असताना देखील उबाठा गटाचे नेते मूग गिळून बसले असून शिवसेना महिला आघाडीच्यावतीने निषेध नोंदवित त्यांच्या तोंडाला चिकट पट्टी लावण्यासाठी आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे जी महिला शिवसेना महिला आघाडी म्हणजे काय हे विचारायला जाऊ का असा विचारते. तिला आनंद दिघे किती कळले. आमदारकी मिळविण्यासाठी हे नाटक सुरु असल्याची टीका ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केली. तसेच हिंमत होती तर, कार्यालयावर येऊन दाखवायचे होते, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणामुळे ठाणे शहरात काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते.

धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे. दिघे साहेबांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुरुंगा बाहेर काढले. तसेच दिघे हे संरक्षण वाढविण्यासाठी माझ्या घरी यायचे असे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नोंदविण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या वतीने उबाठाचे खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार देत, मोर्चा मध्येच अडविला. 

यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार हे जितेंद्र आव्हाड हे ठाणेकरांमध्ये दिघे यांच्या बाबत संभ्रमाचे वातवरण पसरवत असल्याचा आरोप करीत, महसूल खात्याची फेराफेरी झाल्यानंतर ते स्वत: आनंद आश्रमाचे उंबरठे झिजवत होते असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला. तसेच आनंद दिघे हयात असताना, विरोधकांकडून कधीही फलकबाजी करण्यात आली नव्हती. पण आज दिघे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हि उबाठा गटाचे खासदार राजन विचारे असो दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे गप्प आहेत. केवळ राजकारणासाठी दिघे यांच्या फोटोचा वापर करत असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला. 

दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या देखील चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटाच्या महिलांचा विरोध करण्यासाठी व जशाच तसे उत्तर देण्यासाठी आक्रमक झाल्या होत्या. यावेळी जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी मीनाक्षी शिंदे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. मुळात त्यांना दिघे माहित आहे का? जी बाई शिवसेना महिला आघाडी काय, हे विचारायला वर जाऊ का असा प्रश्न करते. तिला आनंद दिघे कितपत कळले. आमदारकी मिळविण्यासाठी हे सर्व नाटक सुरु आहे. हिंमत असेल तर, भिडून दाखवा असा इशारा देखील खोपकर यांनी यावेळी दिला.

Web Title: A single mention of Anand Dighe, why is the leader of the thackeray group silent? Question by Meenakshi Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे