ठाण्यातील जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच जण अडकले, जीवितहानी नाही

By सुरेश लोखंडे | Published: May 15, 2023 01:14 PM2023-05-15T13:14:24+5:302023-05-15T13:15:57+5:30

आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान इमारतीचा  स्लॅब कोसळून तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे.

A slab of an old building in Thane collapsed; Five people trapped, no casualties | ठाण्यातील जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच जण अडकले, जीवितहानी नाही

ठाण्यातील जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच जण अडकले, जीवितहानी नाही

googlenewsNext

ठाणे येथील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या इमारती मधील पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून पाच व्यक्ती अडकल्या. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन जण सुखरूप आहेत.सुरक्षेचं दृष्टीने संपूर्ण इमारती रिकामी  करण्यात  आली आहे. ही इमारत २५वर्ष जुनी आहे.

शहरातील या महत्त्वाच्या ठिकाणी आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान इमारतीचा  स्लॅब कोसळून तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे. मुख्य अग्निशमन नियत्रंण कक्षाने नीळकंठ धरा इमारती बाजूला, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (प.) येथे धाव घेतली आहे. अमर टॉवरच्या तळ  अधीक सात मजली ही इमारत २५ वर्षे जुनी आहे. पहिल्या मजल्यावरील रूम नं. १०१,मालक . सूर्यवंशी यांचा स्लॅब कोसळला असून ५ व्यक्ती अडकल्या होत्या. घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी, उपायुक्त व नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे  जवान ०१- बससह तसेच अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित राहून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

या इमारत दुर्घटनेच्या घटनास्थळी अडकलेल्या पाच लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील तीन व्यक्तींना दुखापत झाली असून उपचाराकरिता पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपचारार्थ दाखल केलेल्यांमध्ये प्रथमेश सूर्यवंशी *(पू (२८),  विजया सूर्यवंशी ( ५४), अथर्व सूर्यवंशी (१४) यांचा समावेश आहे. तर या घटनास्थळी अडकलेल्यांमध्ये प्रियांका सूर्यवंशी ( २४) असून यांना कोणत्याही प्रकारची दुखापत नाही). तर शिशिर पित्रे (६० ) यांना रूम नं. २०१ मधून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

इमारत खाली करण्याचे काम सुरू 

या घटनेत रूम नं. १०१ चा स्लॅब कोसळल्याने तळमजल्यावरील रूम नं. ०१ चे मालक  राजा जोशी च्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Web Title: A slab of an old building in Thane collapsed; Five people trapped, no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे