चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटावर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:58 PM2024-03-04T13:58:58+5:302024-03-04T13:59:45+5:30
या कृत्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. उमेश संजय भोईर असे पतीचे नाव असून त्याच्याविरोधात सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत केळवेरोड पूर्व भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटात कात्रीच्या साहाय्याने वार केल्याची घटना घडली आहे. या कृत्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. उमेश संजय भोईर असे पतीचे नाव असून त्याच्याविरोधात सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळवे रोड येथील लता भोईर व पती उमेश भोईर यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता. त्यानंतर पतीने आपल्या मनात राग धरून पत्नीच्या पोटात व पायावर कात्रीने वार करून गंभीर जखमी केले. गंभीर झालेल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पतीने पत्नीवर वार करताच तो तिथून पळ गेला. याबाबत सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अगोदरही उमेश भोईर यांच्यावर सफाळे व केळवे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.