ठाण्यात २० फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेल्या भटक्या श्वानाची सुखरुप सुटका
By जितेंद्र कालेकर | Published: October 31, 2022 06:19 PM2022-10-31T18:19:51+5:302022-10-31T18:20:12+5:30
कोलशेत खाडीजवळ, पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या सुमारे २०-फूट खोल खडयामध्ये भटके श्वान पडल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे:
कोलशेत खाडीजवळ, पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या सुमारे २०-फूट खोल खडयामध्ये भटके श्वान पडल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्या श्वानाची आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढत जीवदान दिले आहे.
कोलशेत खाडीवरील खड्ड्यात भटके श्वान पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान् दाखल झाले. या दोन्ही विभागांच्या मदतीने जाळी टाकून या श्वानाला पकडण्यात आले. त्यानंतर शिडी लावून त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत त्या श्वानाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.