ठाण्यात महापालिकेमार्फेट उभारलेला स्ट्रीट लाईट पोल पडला; पादचारी जखमी 

By अजित मांडके | Published: June 18, 2024 02:26 PM2024-06-18T14:26:39+5:302024-06-18T14:26:52+5:30

ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत उभारण्यात आलेला स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी घडली.

A street light pole erected by Municipal Corporation in Thane fell Pedestrian injured  | ठाण्यात महापालिकेमार्फेट उभारलेला स्ट्रीट लाईट पोल पडला; पादचारी जखमी 

ठाण्यात महापालिकेमार्फेट उभारलेला स्ट्रीट लाईट पोल पडला; पादचारी जखमी 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत उभारण्यात आलेला स्ट्रीट लाईट पोल रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तीन पेट्रोल पंप येथे घडली. या घटनेत त्या रस्त्यावरून पायी चाललेले कळवा येथील विशाल नारायण कांतेकर (४२) हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनोळखी बसच्या वरती असलेला लगेज सामनाला स्ट्रीट पोलवर बांधलेली केबल अडकल्यामुळे तो पडला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा विद्युत विभागाचे कर्मचारी, नौपाडा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. तसेच रस्त्यावरती पडलेला स्ट्रीट लाईट पोल ठामपा विद्युत विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: A street light pole erected by Municipal Corporation in Thane fell Pedestrian injured 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे