"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:18 PM2024-09-08T19:18:47+5:302024-09-08T19:20:41+5:30

Thane Latest News : UPSC परीक्षेची तयार करत असलेल्या एका तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. 

A student preparing for the UPSC exam in Thane committed suicide by jumping from the 8th floor | "आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

Thane Crime news : UPSC परीक्षेची तयारी करत असलेल्या एका 28 वर्षीय तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. ठाणे शहरातील वर्तकनगरमध्ये ही घटना घडली. वर्तकनगर पोलिसांनी सांगितले की, शनिवारी (7 सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घरात एक सुसाईड नोट मिळाली असून, तरुणाने आत्महत्येच्या कारणाबद्दल लिहिलेले आहे. 

ठाणे शहरातील वर्तकनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरात एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात त्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे. 

वर्तकनगरमधील युवक हाऊसिंग कॉम्प्लेक्स इमारतीच्या आठव्या मजल्यावर त्याचे घर आहे. घरातूनच त्याने खाली उडी मारली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. 

UPSC परीक्षेतील अपयशामुळे डिप्रेशनमध्ये 

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाच्या मित्रांनी सांगितले की, तो यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेत यश मिळत नसल्याने तो डिप्रेशनमध्ये असावा.

सुसाईडनोटमध्ये काय?

पोलिसांना घरात एक सुसाईड नोट मिळाली. त्यात मयत तरुणाने म्हटले आहे की, "माझ्यासाठी या जगात जिवंत राहणे अवघड आहे. मी आई-वडील, भाऊ आणि सगळ्यांची माफी मागतो. मी आता जास्त अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. माझे त्यांच्यावर प्रेम आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही."

Web Title: A student preparing for the UPSC exam in Thane committed suicide by jumping from the 8th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.