निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश

By अजित मांडके | Published: February 20, 2023 04:23 PM2023-02-20T16:23:53+5:302023-02-20T16:24:32+5:30

Thane: कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.

A substandard contractor is blacklisted for three years, Municipal Commissioner orders | निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले, महापालिका आयुक्तांचे आदेश

googlenewsNext

- अजित मांडके
ठाणे - कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, या काळात त्यांना ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर, या कामाची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाबवण्यात आली आहे.

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे अष्टविनायक चौक येथे गेले काही महिने रस्त्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारीक लक्ष होते.रस्त्याचे काम कमी दर्जाचे होत असल्याचे तेथील एका नागरिकाने महापालिका बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. काम खराब होत असल्याची त्या नागरिकाने तक्रार केली. संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला आयुक्तांनी पाहणी करण्यास सांगितले. त्यावर, कंत्राटदाराने न सांगताच हे काम केले आहे. शिवाय त्याची आता दुरुस्तीही केली आहे, असा अहवाल सादर केला. मात्र, तक्रारदाराने त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. कामाच्या दर्जाबाबत त्याचे म्हणणे कायम राहिल्याने, आयुक्तानी अष्टविनायक चौक येथील रस्त्याच्या कामाला अचानक भेट दिली. या भेटीत, रस्त्याचे काम योग्य दर्जाचे नसल्याचे त्यांच्याही निर्दशनास आले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. कामाच्या दर्जाबद्दल त्यांना वाटणारी चिंता त्यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली. तसेच, अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांनी त्यात लक्ष न घातल्याची खंतही व्यक्त केली.

या रस्त्याचे काम मास्टिक प्रकारचे असून या कामात डांबराचे तापमान योग्य न राखल्यास रस्त्याचा पृष्ठभाग लवकर उखडतो. परंतु, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झाल्यास किमान दहा वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त राहू शकेल, अशी खात्री दिली जाते. अष्टविनायक चौकातील मूळ रस्ता खराब झालाच, शिवाय त्याची दुरुस्तीही नीट झाली नाही. याची दखल घेत, त्या कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले. कंत्राटदाराने असमाधानकारक खुलासा केला. त्यामुळे त्याला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. 
या नोटीशीच्या उत्तरात त्याने मूळ काम आणि त्याची दुरुस्ती खराब असल्याचे मान्य केले.

या पार्श्वभूमीवर, कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे, तसेच, ठाणे महापालिकेच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. संबंधित कामाच्या पर्यवेक्षणाची  जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

Web Title: A substandard contractor is blacklisted for three years, Municipal Commissioner orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.