ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन
By अजित मांडके | Published: September 20, 2022 06:53 PM2022-09-20T18:53:59+5:302022-09-20T18:55:23+5:30
ठाण्यात रामदास कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांकडून दहन करण्यात आले.
ठाणे : रामदास कदम यांनी केलेल्या गलिच्छ आणि अश्लिल क्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात संतप्त शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचे जोडो मारून त्यानंतर त्या पुतळ्याचे मंगळवारी ठाण्यातील चिंतामणी चौकात दहन केले. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणा बाजी करत, त्यांना यापुढे महाराष्ट्रात फिरून देणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला.
ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रामदास कदम यांना ठाण्यात शिवसैनिकांकडून हे निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी, रामदास कदम मुर्दाबाद, ५० खोके, निम का पत्ता कडवा है, रामदास कदम... येवढी माणसे कश्यासाठी..., अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक मधुकर देशमुख, संजय तरे, चिंतामणी कारखाणीस, महिला शिवसैनिकांचा मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होता. यावेळी बोलताना खासदार विचारे यांनी कदम यांनी रामदास या नावालाही कलंक लावला आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेही म्हणाले. तर केदार दिघे यांनी कदमांना आपला पराभव दिसू लागला आहे. त्यांचे फिरलेले डोके त्यांनी वेळीच जागेवर आणले नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला.