सत्ताधाऱ्यांकडून केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे काम; विजय वडट्टीवार यांचा आरोप

By अजित मांडके | Published: August 17, 2023 12:56 PM2023-08-17T12:56:36+5:302023-08-17T12:57:19+5:30

राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे.

A task by rulers only to fill their own coffers; Vijay Vadattiwar's allegation | सत्ताधाऱ्यांकडून केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे काम; विजय वडट्टीवार यांचा आरोप

सत्ताधाऱ्यांकडून केवळ स्वतःची तिजोरी भरण्याचे काम; विजय वडट्टीवार यांचा आरोप

googlenewsNext

ठाणे : राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती असल्याचे ही ते म्हणाले. 

कळवा रुग्णालयात झालेल्या 18 मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

घराणेशाही बाबत त्यांना विचारले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला  गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे मग बोट दाखवले जाते, दहा वर्षांच्या उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादी सारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती असा गंभीर आरोप त्यांनी केला. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसीहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता मात्र देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नाही, दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला असल्याचेही ते म्हणाले.

2024 मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरोशावर ते झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच अलबेला सुरू आहे,  एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील सरकारची आहे. ही केवळ राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले 40 आणि आत्ता जे गेले आहेत ते 40 हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत.

ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते नाराज असल्याचे दिसत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यात ज्यांना मंत्रीपद मिळालेले नाही त्यांना यापुढेही मिळणार नसून त्यांनी केवळ बोंबलत राहावे अशीच परिस्थिती आहे.

Web Title: A task by rulers only to fill their own coffers; Vijay Vadattiwar's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.