अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी
By पंकज पाटील | Published: December 15, 2023 04:31 PM2023-12-15T16:31:23+5:302023-12-15T16:31:55+5:30
या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता.
अंबरनाथ-अंबरनाथ पूर्व भागातील राहुल इस्टेट परिसरात सरस्वती देवी इमारतीच्या दोन मजल्याचे स्लॅब थेट दुसऱ्या मजल्यावर पडले आहेत. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत तर सुरक्षेच्या कारणास्तव ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास सरस्वती देवी इमारतीचा काही भाग चौथ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्याचा पूर्ण स्लॅब तिसऱ्या मजल्यावर व तिसऱ्या मजलाचा पूर्ण स्लॅप दुसऱ्या मजल्यावर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घरात राहणारे दोघे जखमी झाले आहेत. या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता. मात्र ही इमारत अद्यापही रिकामी करण्यात आलेली नव्हती. दुपारी स्लॅप पडण्याची घटना घडल्यानंतर लागले अग्निशमन दलाने ही संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. इमारतीचा स्लॅब पडल्याची घटना समोर येतात स्थानिक रहिवाशांनी देखील या ठिकाणी गर्दी केली होती.
अंबरनाथ शहरात अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असताना देखील त्या रिकामी करण्यात आलेल्या नाहीत. तर काही इमारती धोकादायक अवस्थेत असताना त्यांना अद्यापही धोकादायक ठरवण्यात आलेले नाही. चार दिवसांपूर्वीच अंबरनाथच्या कानसई परिसरात एका इमारतीचा सज्जा कोसळला होता. ही इमारत देखील धोकादायक ठरवण्यात आली नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन धोकादायक इमारती ठरवण्याबाबत गंभीर नसायची बाब समोर येत आहे.