Thane: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी छेड काढणाऱ्याला मुलींनी झाडूने दिला चोप; ठाण्यातील Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:37 PM2023-02-15T18:37:45+5:302023-02-15T18:38:26+5:30

सोशल मीडियावर ठाण्यातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

A video from Thane of girls beating up a young man who was teasing on Valentine's Day is going viral | Thane: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी छेड काढणाऱ्याला मुलींनी झाडूने दिला चोप; ठाण्यातील Video Viral

Thane: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी छेड काढणाऱ्याला मुलींनी झाडूने दिला चोप; ठाण्यातील Video Viral

googlenewsNext

Mumbai Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर ठाण्यातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली छेड काढणाऱ्या तरूणाला चोप देताना दिसत आहेत. मंगळवारी सर्वत्र व्हॅलेटाईंन डे साजरा करण्यात आला. मात्र, ठाण्यातील या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील वडवली गावातील असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, 2 मुली छेड काढणाऱ्या तरूणाला झाडूने चोप देत आहेत. ही घटना कल्याणच्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील वडवली गावची आहे. इथे रस्त्याने जाणाऱ्याने एका तरुणीकडे याबाबत चौकशी केली असता, हा तरुण मुलींचा विनयभंग करत असल्याचे आढळून आले. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत दोन्ही मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मुलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आम्ही मुलीला मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करू आणि त्यानुसार कारवाई करू." 

याप्रकरणी वडवली गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, परिसरात विनयभंगाच्या घटना वाढल्या असून आम्ही याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली आहे. येत्या काही दिवसांत विनयभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: A video from Thane of girls beating up a young man who was teasing on Valentine's Day is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.