उल्हासनगरातील मिठाईच्या दुकानात समोसा पीठ पायाने मळतानाचा व्हिडीओ व्हायरल
By सदानंद नाईक | Published: March 4, 2024 09:44 PM2024-03-04T21:44:14+5:302024-03-04T21:44:42+5:30
संतप्त नागरिकांची दुकांना विरोधात केली नाराजी
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहर पूर्वेतील आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानात समोशाचे पीठ पायाने मळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, एकच खळबळ उडाली. परिसरातील संतप्त नागरिकांनी एकत्र येत नाराजी व्यक्त करीत कारवाईची मागणी केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे व्हायरल व्हिडीओ व माहिती पाठविली आहे.
उल्हासनगर पूर्वेतील आशेळेगाव येथे गेल्या २० वर्षांपासून एक मिठाईचे दुकान असून दुकानात समोसा विकला जात होता. दुकानात एक इसम समोशाचे पीठ पायाने मळतानाचा व्होडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच संतप्त नागरिकांनी दुकानाच्या दिशेने धाव घेऊन दुकांना विरोधात कारवाई करण्याची मागणी विठ्ठलवाडी पोलिसांकडे केली. मात्र हा सर्व प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागा अंतर्गत येत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. मात्र पायाने समोशा पीठ मळवटनाचा व्हायरल व्हिडीओ व दुकांनाबाबतची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठविल्याची माहिती त्यांनी सांगितले.
आशेळेगाव येथील वादग्रस्त मिठाईच्या दुकांनाची झाडाझडती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पथक करणार आहे. व्हायरल व्हिडीओत सत्यता आढळल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. वादग्रस्त दुकानातून पॉकीटबंद वस्तू शिवाय कोणतीही वस्तू विकायला परिसरातील नागरिकांनी निर्णय घेतला आहे. रात्री पर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाचे पथक शहरात दाखल होऊन कारवाई करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी दिली आहे.