टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 07:56 AM2023-07-17T07:56:10+5:302023-07-17T07:56:35+5:30

टोईंग गाडीवाल्यांनी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली. 

A young man was seriously injured when his leg got stuck in the net while running behind the towing vehicle | टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी

टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील नो पार्किंग ठिकाणी उभी केलेली मोटरसायकल टोईंगवाले नेताना तरुणाने तिकडे धाव घेतली. मात्र, दुकानासमोरील लोखंडी जाळीत पाय अडकून तो तरुण जाणाऱ्या रिक्षावर पडल्याने, गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. टोईंगवाल्यासह दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

उल्हासनगरात रस्त्याच्या नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या गाड्या कोणतीही पूर्वसूचना देता व मार्किंगविना उचलल्या जात असल्याने, टोईंगवाल्यांविरोधात नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. या दरम्यान शहरात पश्चिममध्ये शनिवारी दुपारी टोईंग गाडीवाल्यांनी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली. 

डोक्याला तब्बल १७ टाके 
उचललेली गाडी घेण्यासाठी विनय धावत गेला असता, दुकानासमोर ठेवलेल्या लोखंडी जाळीत पायात अडकून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर जाऊन पडला. यामध्ये त्याचे डोके फुटून रक्ताने माखला. टोईंग गाडीवरील वाहतूक पोलिस व स्थानिक व्यापाऱ्यांनी विनयला क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्याच्या डोक्याला तब्बल १७ टाके पडले असून, आमदार कुमार आयलानी यांच्यासह व्यापाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

कारवाई करण्याची मागणी
n अपघातानंतर व्यापारी व स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभाग कार्यालयात धाव घेऊन टोईंगवाल्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दुकानासमोर थेट फुटपाथच्या पुढील रस्त्यावर लोखंडी जाळी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 
n दुकानांसमोर अवैधपणे जाळी ठेवूनही महापालिका प्रभाग अधिकारी कारवाई करीत नसल्याने, अशा अधिकाऱ्यांवरही या निमित्ताने कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला आहे.

वाहतूक विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात
वाहतूक विभागाच्या टोईंगवाल्यांमुळे विनय भोईर जखमी झाला असल्याचा आरोप एकीकडे होत आहे, तर दुसरीकडे व्यापारी दुकानासमोरील फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर लोखंडी जाळी टाकत असल्याने असे अपघात होत असल्याचे बोलले जाते. 
दुकानासमोर लोखंडी जाळ्या ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून या जाळ्या महापालिका जप्त का करीत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातप्रकरणी दादागिरी करणारे टोईंगवाले व संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: A young man was seriously injured when his leg got stuck in the net while running behind the towing vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.