मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या; अवघ्या 24 तासात हत्येचा केला उलगडा

By पंकज पाटील | Published: September 6, 2023 07:45 PM2023-09-06T19:45:17+5:302023-09-06T19:45:37+5:30

मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या केल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे.

A youth was killed with a rod for not giving him a mobile phone murder was solved in just 24 hours | मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या; अवघ्या 24 तासात हत्येचा केला उलगडा

मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या; अवघ्या 24 तासात हत्येचा केला उलगडा

googlenewsNext

अंबरनाथ : मोबाईल न दिल्याने एका तरुणाची रॉड घालून हत्या केल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच तीन आरोपींना अटक केली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात एमआयडीसी जवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असताना लालजी सहाय हा तरुण फोनवर बोलत असताना त्या ठिकाणी शंभू मांझी हा तिकडे आला आणि त्याने लालजी यांच्याकडे मोबाईल मागितला मात्र लालजी यांनी मोबाईल न दिल्याने शंभू याला राग आला आणि त्याने बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने लालजी यांच्या डोक्यात मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, मात्र हत्या झालेल्या मृतदेहाची विल्हेवाटला कशी लावायची असा प्रश्न शंभू याला पडला त्यानंतर शंभू यांनी आपले दोन मित्र मनोदीप जामु, चिल्ला मांझी या दोघांची मदत घेत शंभू याने पालेगाव जवळ हा मृतदेह पाण्याने भरलेल्या एका डबक्यात फेकून हे तिघेजण फरार झाले. 

पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी तपासाला वेगाने सुरुवात केली या प्रकरणात 40 संशयित जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणात तीन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून शंभू मांझी,मनोदीप जामु,चिल्ला मांझी या तिन्ही आरोपींना अंबरनाथ मधून अटक करण्यात आली आहे, तर या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची पोलीस कठोडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी दिली आहे. 
 

Web Title: A youth was killed with a rod for not giving him a mobile phone murder was solved in just 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे