'आमच्या पप्पांनी गंपती आणला'चे मूळ गायक मोहित, शौर्य घोरपडेचा केंद्रीय मंत्र्याकडून सन्मान
By नितीन पंडित | Published: September 27, 2023 06:09 PM2023-09-27T18:09:15+5:302023-09-27T18:14:36+5:30
भिवंडीतील चिमुकल्या कलावंतांचा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला सन्मान
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: आमच्या पप्पांनी गंपती आणला या गाण्याचे मुळ चिमुकले गायक मोहित घोरपडे व शौर्य घोरपडे यांचा सन्मान केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी आपल्या हायवे दिवे येथील निवासस्थानी केला आहे.हे दोघे गायक भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील चरणी पाडा येथील रहिवाशी आहेत.प्रसिद्धी पासून दूर असलेल्या या चिमुकल्या गायकांसह गीताचे गायक मनोज घोरपडे यांना माध्यमांनी प्रसिद्धी दिल्यानंतर त्यांची राजकीय सामाजिक स्तरा वरून अनेकांनी दखल घेतली आहे.
राहनाळ गावचे माजी सरपंच राजेंद्र भोईर यांच्या प्रयत्नांनी केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याचवेळी स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या गायन कार्यक्रमात टॉप फाईव्ह मध्ये पोहचलेल्या काव्या शैलेश भोईर हिचाही सन्मान केला आहे.
भिवंडी ग्रामीणभागात देखील अनेक कलागुणांनी संपन्न असे कलाकार आहेत त्यांना समाजा समोर आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असून तालुक्याला नव्हेच तर जिल्ह्याला अभिमानास्पद असलेले हे कलावंत माझ्या मतदारसंघातील असल्याचा आनंद मला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.