आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 11:13 PM2021-08-03T23:13:49+5:302021-08-03T23:14:16+5:30

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले.

aao Seva Pratishthan Konkan Bhumi Pratishthan helping flood affected people of Konkan | आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. महापूरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणार्‍या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे हात पुढे आले. त्यात  ठाण्यातील आई प्रतिष्ठान तसेच कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिसनेस फोरम आणि रमाई  सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला. सुमारे दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचे साहित्य, साबण, मेणबत्ती, माचिस, औषधे, ताडपत्री आदी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचबरोबर पुरग्रस्तांची तपासणी करीत त्यांच्यावर उपचारही केले.

आई सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार दिलीप शिंदे, अध्यक्ष संतोष शिंदे  आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत चार ट्रक भरून साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे महाड शहर पुरात बुडाले. तर तळीये गावात दरड कोसळून 84 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच खेडमधील पोसरेमध्ये भुस्खलन  होऊन 17 जण मृत्यू पावले. चिपळूण शहर बुडाला. महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक गांवे हे पाण्याखाली गेली आणि सहा हजार कोटींचे  नुकसान झाले. त्या पुरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी राज्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. तरी ही ज्या गावांना मदत पोहचली नाही, अशा कातकरी, धनगर वस्ती व गावांमध्ये या संस्थांनी पोहचण्याचा प्रयत्न केला.  महाड आणि शेजारील वाड्या, वस्त्या, खेड तालुक्यातील चिंचघर, पोसरे, सापिर्ली, चोरवणे, सापर्ली देऊळवाडी, कातकर वाडी, साखर, कासई, धामनंद, कावळे, तळवट, पाली, खोपी, शिरगांव, धामनंद, चोरवणेमधील सुतारवाडी, उतेकरवाडी, डांगेवाडी, सार्पिली आणि पोसरे गावातील कातकरी वाडी, चिपळूण, दळवटणे, हिंगवलेवाडी, पेढे, बहादूरशेख नाका, कलबस्ते, शंकरवाडी, खेर्डी, सती, काना पिंपरी, खडपोली, गानेखडपोली येथील नदीपात्रातील धनगर व कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. साहित्य वाटपासह धामनंद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सदानंद जाधव, डॉ. भगवान गायकवाड, डॉ. दिगंबर वडजे, डॉ. संपदा जाधव, संजय काटकर यांनी सुमारे 95 ग्रामस्थांची तपासणी केली. शुगर तपासणीसह अन्य तपासण्या करीत त्यांना मोफत औषधे ही दिली.

या पुरग्रस्त भागामध्ये तीन दिवस राहून पत्रकार दिलीप शिंदे, संतोष शिंदे, रमाई ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शशी गमरे, अ‍ॅड. राणू गमरे, विश्‍वास शिंदे, विकास माहिमकर, सचिन झंझाड, संतोष शेलार, रोहन खाडे यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवली. तसेच धामनंद ग्रामपंचायत सदस्य संभाजी उतेकर यांनी मदत केली.

Web Title: aao Seva Pratishthan Konkan Bhumi Pratishthan helping flood affected people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.