ठाणे मनपा निवडणुकीत उतरणार आप; वाढणार इतर पक्षांचा ताप
By अजित मांडके | Published: November 12, 2022 03:37 PM2022-11-12T15:37:02+5:302022-11-12T15:39:27+5:30
दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात 'आप' संघटन विस्तारास अधिक गती मिळण्यासाठी नवीन कमिटीचे गठन करण्यात आले आहे.
ठाणे - एकीकडे शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना 'आप'ने दिल्ली व पंजाब प्रमाणे ठाणेकरांना सुद्धा पाणी पट्टी, विज, दर्जेदार शिक्षण व आरोग्य मोफत देणार असल्याचे जाहीरनामाद्वारे घोषणा केली आहे. त्या माध्यमातून ठाणेकरांनी 'आप' ला एकहाती सत्ता द्यावी. आणि भष्ट्राचार मुक्त ठाणे हाच आमचा संकल्पनेवर ठाणेकर प्रतिसाद देतील याची खात्री आप ने शनिवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. ठाणे मनपावर सत्ता मिळवण्यासाठी जाहिरनाम्याद्वारे विविध घोषणा केल्याने इतर पक्षांना अडचण होऊ शकते. अशी शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली आहे.
दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात 'आप' संघटन विस्तारास अधिक गती मिळण्यासाठी नवीन कमिटीचे गठन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या ठामपा निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व स्तरातील ठाणेकरांना पक्षाची उमेदवारी देण्याचा आप ने निर्णय घेतला आहे. दिल्ली व पंजाब प्रमाणे ठाण्यातील जनतेला सुद्धा पाणी पट्टी, विज, दर्जेदार शिक्षण व आरोग्य मोफत देण्यासाठी ठाणेकरांनी 'आप' ला एकहाती सत्ता द्यावी. असे आवाहन आप चे ठाणे पालघर जिल्हा संयोजक विजय पंजवानी यांच्यासह ठाणे पालघर जिल्हा सचिव मधुकर फर्डे , ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर तसेच ठाणे शहर उपाध्यक्ष संदेश विचारे यांनी केले आहे.