सार्वजनिक वाहतूक करणार सक्षम - पालकमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:51 AM2020-01-21T00:51:01+5:302020-01-21T00:51:52+5:30
जनतेची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांसह सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याचे सुतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
ठाणे : जिल्ह्यातील जनतेची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांसह सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याचे सुतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, आमदारही यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम राहिल्यास, वेळेवर उपलब्ध झाल्यास लोक त्यांची वाहने रस्त्यावर आणणार नाही. सार्वजनिक सेवेचा लाभ घेतील. यामुळे जिल्ह्यात कोठेही वाहतूककोंडी होणार नाही. यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यावर भर देण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेतले जातील. यामध्ये महापालिकांच्या परिवहन सेवाही सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास आराखड्यास अनुसरून ते म्हणाले की जिल्ह्याच्या विकासास अनुसरून जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना, विशेष घटन योजना आदींच्या जिल्हा वार्षिक प्रारूप विकास आराखड्यावर डीपीसीत झालेल्या चर्चेस अनुसरूनदेखील शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली.
दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई
गेल्या आर्थिक वर्षातील निधीचा खर्च न करणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. तर जिल्ह्यात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. त्यांच्या निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे अधिकाºयांनी नमूद केल्याचे शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या डीपीसीला उपस्थित नसलेल्या अधिकाºयांवरही कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. लोकप्रतिनिधी उपस्थित असूनही अधिकारी, महापालिकांचे आयुक्त उपस्थित न राहिल्यामुळे सभागृहात अधिकाºयांनी पालकमंत्र्यांना साकडे घालून या गैरहजर अधिकाºयांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली.