स्मशानभूमी विकासाचा फसवा आराखडा रद्द करा; मुख्यमंत्र्यांनी द्यावी स्मशानभूमीला भेट, नागरिकांचे आवाहन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 8, 2023 01:47 PM2023-10-08T13:47:30+5:302023-10-08T14:07:41+5:30

कोपरिवासियानी सांगितल्याप्रमाणे आराखडा तयार न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयोजकांनी दिला.

Abolish the fraudulent cemetery development plan; Chief Minister should visit the cemetery, appeal to citizens | स्मशानभूमी विकासाचा फसवा आराखडा रद्द करा; मुख्यमंत्र्यांनी द्यावी स्मशानभूमीला भेट, नागरिकांचे आवाहन

स्मशानभूमी विकासाचा फसवा आराखडा रद्द करा; मुख्यमंत्र्यांनी द्यावी स्मशानभूमीला भेट, नागरिकांचे आवाहन

googlenewsNext

ठाणे: वागळे स्मशानभूमी प्रमाणे कोपरी ठाणेकरवाडी स्मशानभूमीचा विकास व्हावा याकरीता ठाणे महानगर पालिका प्रशासनाने दोन मजली सभागृह ईमारतीचा समावेश असलेल्या विकासाचा फसवा आरखडा ताबडतोब रद्द करावा व नवा सुसज्य विस्तारित स्मशानभूमीचा आराखडा तयार करावा ह्या कोपरीकरांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ यांच्या वतीने जन-जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घालत त्यांनी या स्मशाभूमीला आवाहन केले आहे. 

कोपरिवासियानी सांगितल्याप्रमाणे आराखडा तयार न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयोजकांनी दिला. यावेळी ५०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. सिद्धी विनायक नगर - (गांधी नगर) येथून सुरू झालेली ही पदयात्रा - कामगार कल्याण केंद्र, आनंद नगर - बाराबंगला सर्कल - सिद्धार्थ नगर - मारुती मंदिर, साईनाथ नगर - नारायण कोळी चौक - अष्टविनायक चौक - काशी आई मंदिर - राधाकृष्ण मंदिर,(TJSB Bank) – भाजी मार्केट नाका – पारशीवाडी, हनुमान मंदिर - ठाणेकरवाडी नाका - शिवाजी महाराज स्मारक, कन्हैय्या नगर येथे समाप्त झाली.

स्मशानभूमी येथील सभागृहच्या कामाला आधीच स्थगिती दिली आहे. विशिष्ट समाजाकरता ती जागा दिली जाणार नाही. स्थगिती असताना ती रॅली काढण्याचा हेतू समजत नाही. ठाणे महापालिकेने जो आराखडा केला आहे त्यात नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्या, हे काम नागरिकांच्या विरोधात नाही. स्मशानभूमीसाठी पुरेपूर जागा राहणार आहे.
- नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिवसेना (शिंदे गट) 

Web Title: Abolish the fraudulent cemetery development plan; Chief Minister should visit the cemetery, appeal to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.