ठाण्यात तीन महिन्यात सुमारे 36 लाख 95 हजारांचे अंमली पदार्थ जप्त 

By जितेंद्र कालेकर | Published: March 28, 2023 04:47 PM2023-03-28T16:47:59+5:302023-03-28T16:48:11+5:30

ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

About 36 lakh 95 thousand narcotics seized in Thane in three months | ठाण्यात तीन महिन्यात सुमारे 36 लाख 95 हजारांचे अंमली पदार्थ जप्त 

ठाण्यात तीन महिन्यात सुमारे 36 लाख 95 हजारांचे अंमली पदार्थ जप्त 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यात अमली पदार्थ विरोधी कायदयातर्गत 84 जणांविरुद्ध 64 गुन्हे दाखल केले. यामध्ये 36 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी मंगळवारी दिली.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. दिपक कुटे, टपाल विभागाचे पोष्टमास्टर प्रदीप मुंढे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक गिरिश बने आदी उपस्थित होते. अमंली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत आठ प्रकरणात 13 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 136 किलो 539 ग्राम गांजा, एका तस्कराकडून एक किलो चरस, 14 जणांकडून 337.28 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. अमंली पदार्थ सेवन करणाऱ्या 56 जणांविरुद्ध कारवाई केली. अंमली पदार्थ विरोधी पथक अन्न व औषध विभागासोबत विविध ठिकाणी तपासणी करीत आहे.

अवैधरित्या विक्री होणाऱ्या खोकल्यावरील औषधाविरुध्द तसेच गांजा सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार आहे. ठाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रातील १८ बंद रासायनिक कंपन्यांपैकी पाच बंद कंपन्यांची तपासणी केली असून उर्वरीत कंपन्याचीही तपासणी केली जाणार आहे. कुरीअर कंपन्याची बैठक आयोजित करून त्यांना कुरीयर मार्फत होणाऱ्या अंमली पदार्थाचे तस्करीचे अनुषंगाने मार्गदर्शन करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. अंमली पदार्थाच्या दुष्परीणामांबाबत जनजागृती अभियान, शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था याठिकाणी प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. कारागृहातील आरोपीकडून अंमली पदार्थाचे विक्री व पुरवठाबाबत गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्याविरुध्द योग्य ती कारवाईचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Web Title: About 36 lakh 95 thousand narcotics seized in Thane in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.