ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा
By सुरेश लोखंडे | Updated: June 18, 2024 17:10 IST2024-06-18T17:09:43+5:302024-06-18T17:10:37+5:30
गावांना ४८ खासगी टॅंकरने पाणी पुरवठा.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा
सुरेश लोखंडे, ठाणे : पावसाळा लागून १५ दिवस झाले. मात्र जिल्ह्यात आजूपर्यंतही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही तब्ब्ल ४८ खासगी टॅंकरवद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीव घेणी पाणी टंचाई आजही सुरू आहे. अर्धा जून संपत असतानाही जाेरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ माेठ्या गांवांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टॅंकर पाणी पुरवठा करीत आहेत. शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर मुरबाड तालुक्यातील १७ माेठे गांवे आणि १८ पाड्यांसाठी सहा टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मुरबाडमधीाल ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणी टंचाईच्या समस्येला ताेंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टॅकरने एक लाख एक हजार ७०७ लाेकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात आला हाेता.