विनापरमिट धावताहेत साडेचार हजार रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:23 AM2018-07-05T02:23:54+5:302018-07-05T02:24:01+5:30
ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे.
ठाणे : ठाणे-भिवंडी-भार्इंदर या परिसरात विनापरमिट नव्याकोऱ्या चार हजार ५०० आॅटोरिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत, ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने त्या मालकचालकांना परमिट नेण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच येत्या सोमवारपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील नोंदणी केलेल्या रिक्षांची काटेकोरपणे तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ सूत्रांनी सांगितले.
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नोंदणी केलेल्या आॅटोरिक्षांना ‘मे’ महिन्यात एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेनुसार १० हजार रिक्षांना नंबरवाटप केले आहे. यावेळी आॅटोरिक्षाधारकांनी ठाणे कार्यालयाकडे रिक्षापरवाना घेण्यासाठी अर्जाद्वारे त्याचे इरादापत्र प्राप्त करून त्याआधारे वाहनाची नोंदणी करून घेतलेली आहे. मात्र, कार्यालयीन तपासणीत १० हजार नोंदणी झालेल्या आॅटोरिक्षांपैकी साडेपाच हजार रिक्षाचालकांनी परमिट घेतले असून उर्वरित साडेचार हजार रिक्षाचालकांनी कागदपत्रे (पक्का परवाना, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र) परिपूर्ण करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेतील सर्व रिक्षा परवानाधारक-मालकांनी त्यांच्या रिक्षाच्या कागदपत्रांची ठाणे आरटीओ कार्यालयात पूर्तता करून घ्यावी व मूळ वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे.
दरम्यान, आरटीओच्या वायुवेग पथकामार्फत ९ जुलैपासून एमएच ०४ एचझेड या क्रमांकमालिकेमधील नोंदणी केलेल्या रिक्षांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी वैध कागदपत्रे सोबत न बाळगणाºया रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. तसेच काही रिक्षाचालकांनी १५ हजारांचे डीडी कार्यालयात जमा केले आहेत. पण, आॅनलाइन प्रक्रिया झाल्याने ते डीडी आरटीओ विभागाला भरता येत नाहीत. ते त्या रिक्षाचालकांनी परत नेण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. त्याला १५-२० दिवस झाल्यानंतर अद्यापही कोणी आलेले नाही.
- तपासणी मोहिमेसाठी चार वायुवेग पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात दोन जण असणार असून ते ठाणे-भिवंडी-भार्इंदर परिसरात तपासणी करणार आहे. सर्वाधिक रिक्षा भिवंडी-भार्इंदर या परिसरात धावत आहेत. या तपासणीत वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्या रिक्षाचालकांकडून मोटार वाहन कायद्यांतर्गत चार हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.