स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:25 PM2020-11-04T12:25:17+5:302020-11-04T12:26:44+5:30

शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

Accelerate Surya Pani Yojana by convincing the locals, suggests the Chief Minister | स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

स्थानिकांना विश्वासात घेऊन सूर्या पाणी योजनेला गती द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना 

Next


मीरारोड - मीरा भाईंदर सह वसई विरार व परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेचे काम एमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून सदर काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कामातील अडथळे दूर करून, आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात व येत्या एक - दिड वर्षांत योजनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासनास दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. अपुरे पाणी आणि सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे शहरासाठी 'एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरू असलेल्या २१८ दशलक्ष लिटर सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांना केली होती.  

२०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी तीन वर्षांपूर्वी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे मीरारोड येथे भूमिपूजन केले गेले . परंतु योजना मात्र आजही बारगळलेली आहे. शिवाय  पालघरमधील स्थानिकांचासुद्धा वसई - विरार व मीरा भाईंदरला पाणी देण्यास विरोध आहे. 

मेट्रो ४ व मेट्रो १० जोडणाऱ्या मेट्रो कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करा -
मुंबई मेट्रो मार्ग-४ हा वडाळा - कासारवडवली - गायमुखपर्यंत तर मेट्रो मार्ग क्रमांक १० हा दहिसर - काशिमीरा ते भाईंदर, असा असून या दोन्ही मेट्रोचे काम सुरू आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी गायमुख ते काशीमीरा या अंदाजे ५ किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी अशी सरनाईक यांची मागणी होती. ठाणे - मीरा भाईंदर - मुंबई, असे हे सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास लाखो लोकांना त्याचा फायदा होईल यामुळे ही मेट्रो एकमेकांना जोडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे ते म्हणाले . त्यावर या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मीरा भाईंदर महापालिकेत फोफावलेला भ्रष्टाचार व शहरातील कायदा सुव्यवस्था यावरही चर्चा झाली.  शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न , झोपडपट्टी पुनर्वसन योजना , मीरा भाईंदरमधील न्यायालय इमारतीचे काम , डीम्ड कन्व्हेन्स, बीएसयुपी योजनेला गती देणे, भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणारा आणखी एक उड्डाणपूल मंजूर करणे , भाईंदरमध्ये जैव विविधता उद्यान विकसित करण्यास निधी उपलब्ध करून देणे आदी मुद्यांकडेही मुख्यमंत्र्यांना आमदार गीता जैन व आपण निवेदन दिल्याचे आमदार सरनाईक म्हणाले. 

Web Title: Accelerate Surya Pani Yojana by convincing the locals, suggests the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.