Accident: ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

By अजित मांडके | Published: November 22, 2022 11:18 AM2022-11-22T11:18:12+5:302022-11-22T11:19:38+5:30

Thane: विमानतळ येथून माजीवडा येथे प्रवासी घेऊन आलेल्या एका चारचाकी कारला ठाण्यातील गोकुळ नगर येथे मंगळवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली.

Accident: A speeding car caught fire in Thane, fortunately there was no loss of life | Accident: ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

Accident: ठाण्यात भरधाव कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

Next

- अजित मांडके
ठाणे : विमानतळ येथून माजीवडा येथे प्रवासी घेऊन आलेल्या एका चारचाकी कारला ठाण्यातील गोकुळ नगर येथे मंगळवारी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास अचानक आग लागली. या धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने त्या आगीची धग रस्त्यावर उभ्या केलेल्या दोन रिक्षांना बसली असून ती तिन्ही वाहने जळुन खाक झाली आहे. या घटनेमुळे त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

कार चालक शामलाल गुप्ता हे ओला कॅबने मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळ तेथून प्रवासी भाडे घेऊन ठाण्यातील माजिवाडा येथे एक प्रवास घेत दाखल झाले. ते गोकूळ नगर येथे आल्यावर अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. त्यामुळे ज्या रस्त्या कार उभी केली त्याच्या शेजारी पार्क असलेल्या २ रिक्षांनाही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी राबोडी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. जवळपास सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ही आग शहरात जाणाऱ्या रस्त्यावर लागल्याने त्याचा फटका सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या  विद्यार्थ्यांसह कामधंद्याला बाहेर पडलेल्या नागरिकांना कळत नकळत बसला. तसेच यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. झालेली कोंडी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्यानंतर काही मिनिटांनी सुटल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Accident: A speeding car caught fire in Thane, fortunately there was no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.