भाईंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर विहीरीलगत खचलेल्या रस्त्यामुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 08:25 PM2020-03-01T20:25:33+5:302020-03-01T20:25:41+5:30

महापालिका बळी जाण्याची वाट पाहतेय का ? नगरसेवकांचा सवाल

Accident due to dirt road on Bhayandar hill - Uttan road | भाईंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर विहीरीलगत खचलेल्या रस्त्यामुळे अपघात

भाईंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर विहीरीलगत खचलेल्या रस्त्यामुळे अपघात

googlenewsNext

मीरारोड - भार्इंदरच्या डोंगरी - उत्तन मार्गावर असलेल्या भल्या मोठ्या विहरी जवळचा रस्ता गेल्या वर्षी जुलै मध्ये खचुन सतत अपघात होत असताना देखील मीरा भार्इंदर महापालिके कडुन मात्र अजुनही दुरुस्ती काम हाती घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर उत्तन सागरी पोलीस देखील अपघाताच्या नोंदी करुन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी या भोंगळ व बेजबाबदार कारभारा विरुध्द संताप व्यक्त करत प्रशासन लोकांचे बळी जाण्याची वाट पाहतेय का ? असा सवाल केला आहे. आज रवीवारी पहाटे एका मोटार कारला भिषण अपघात झाला व आतील प्रवासी जखमी झाले.

गेल्या वर्षी १ जुलै रोजी भार्इंदरच्या डोंगरी खदानी समोर असलेल्या जुन्या मोठ्या विहिरी लगतचा रस्ता खचला होता. सदर रस्ता खचल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणुन दिल्याने त्यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. त्या नंतर पालिकेने रस्ता खचला त्या ठिकाणी लोखंडी खांब उभे केले जेणे करुन वाहन विहरीत पडु नये. भार्इंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकादमी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगर र्पयत रस्ता तसा अरु ंदच आहे.

येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. शिवाय गेल्या वर्षी पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली . भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत असल्याने तेथे देखील खांब लावले. विहरी कडे खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी लोखंडी खांब पालिकेने लावले पण वाहनांची संख्या व वेग पाहता या ठिकाणी गतीरोधक बसवले नाहित, सुरक्षेच्या अनुषंगाने ब्लिंकर, वीज दिवे आदी बसवले नाहित.

लोखंडी खांब रात्री वा पहाटेच्या वेळी लक्षात येत नसल्याने आज रवीवार १ मार्च रोजी पहाटे एका मोटार कारने येथील लोखंडी खांबास जबर धडक दिली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच आतील प्रवाशांना लागले असे त्यावेळी ये - जा करणाराया लोकां कडुन सांगण्यात आले. परंतु उत्तन सागरी पोलीस ठाण्याने मात्र या अपघाताची नोंद घेऊन बेदरकार वाहन चालवणाराया चालका विरुध्द कारवाईच केली नसल्याचा संताप लोकंनी व्यक्त केला आहे. काही दिवसां पुर्वी भारत सरकार असे लिहलेली मोटार येथील खांबाला रात्रीची धडकल्याने मोठा अपघात झाला होता. पण त्या बाबत देखील पोलीसांनी कारवाई केली नसल्याचे सुत्रांनी सांगीतले. त्यामुळे पालिकेसह पोलीसांची भुमिका देखील बेजबाबदारपणाची असल्याचा रोष नागरिक व्यक्त करत आहेत.

४९ वर्षां पूर्वी ९ जुलै १९७० रोजी रात्री साडे आठच्या सुमारास एसटी बस येथील विहरीत पडून भीषण दुर्घटना घडली होती . त्या मध्ये ९ प्रवाश्याना आपले प्राण गमवावे लागले होते . आधीच येथील तलावाची अर्धी भिंत यंदाच्या पावसात पडली असून आता येथील विहरी लगतचा रस्ता खचल्याने ग्रामस्थांना ४९ वर्षां पूर्वीच्या झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणींनी झोप उडवली आहे . परंतु महापालिका मात्र रस्त्याचे बांधकाम व संरक्षक भिंत बांधण्याच्या कामास गेल्या वर्षा पासुन टाळटाळ करत असल्याने मोठा अपघात होऊन लोकांचे बळी जाण्याची वाट पहात आहेत का ? असा संताप स्थानिक नगरसेवक शर्मिला गंडोली, हेलन गोविंद व एलायस बांड्या सह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Accident due to dirt road on Bhayandar hill - Uttan road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.