मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ अपघात
By admin | Published: July 21, 2015 01:44 AM2015-07-21T01:44:51+5:302015-07-21T01:44:51+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सोमवारी पहाटे भरधाव एसटी आणि खाजगी आराम बसची टक्कर झाली. या दोन्ही बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून,
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सोमवारी पहाटे भरधाव एसटी आणि खाजगी आराम बसची टक्कर झाली. या दोन्ही बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून, तिघा प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. गांधारपाले गावच्या हद्दीत वळणावर हा अपघात घडला. अपघातानंतर तासभर महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली होती.
बोरीवली - खेड ही एसटी बस गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी आरामबसवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात संदेश चांढवेकर (महाड), ओंकार त्रिवेदी (मुंबई), डिंपल साळुंखे (पोलादपूर), संध्या साळुंखे (पोलादपूर), चंद्रकांत सावंत (मुंबई), मयुरी सावंत (खेड), मनीषा आलिम, नागोजी मोरे (खेड), रमाकांत शिंदे, सरस्वती चव्हाण, नामदेव चव्हाण (रा. बोरीवली), बाळकृष्ण सालेकर (गोरेगाव), संजय गीते, सरिता सागवेकर, चंद्रकांत सागवेकर, सावित्री साळुंखे (खेड), तेजस जाधव (सांताक्रुझ), रुपाली जाधव, अनुसया साळुंखे (खेड), दादासाहेब ठिकले (खेड), प्रदीप महाडिक (बेलापूर), दीपक नागवेकर (रत्नागिरी), मयूर सावंत, महेश सावंत (खेड) हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कैलास साळवी (चालक, विक्रोळी), आनंद लक्ष्मण होळकर (शिवाजीनगर) व मच्छिंद्र रामदास खराडे (मुंबई) हे तिघे जण गंभीर जखमी आहेत. शहर पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)