अपघातग्रस्तांना RTO कडून तातडीने मिळते मदत, अभिनेत्री अश्विनी म्हणाल्या 'हे' अभिमानास्पद

By जितेंद्र कालेकर | Published: January 17, 2023 06:45 PM2023-01-17T18:45:06+5:302023-01-17T18:48:52+5:30

अबोली रिक्षाचालक महिलांचेही केले कौतुक: अबोलीसह आरटीओची दुचाकीवरुन सुरक्षा रॅली

Accident victims get immediate help from RTO, Ashwini Mahangade said proudly | अपघातग्रस्तांना RTO कडून तातडीने मिळते मदत, अभिनेत्री अश्विनी म्हणाल्या 'हे' अभिमानास्पद

अपघातग्रस्तांना RTO कडून तातडीने मिळते मदत, अभिनेत्री अश्विनी म्हणाल्या 'हे' अभिमानास्पद

googlenewsNext

जितेंद्र कालेकर

ठाणे : अपघातग्रस्तांना प्रसंगी जीवाची बाजी लावून आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आणि कर्मचारी हे तातडीची मदत करण्याचे काम करतात ही बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे कौतुगोद्वागार अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी मंगळवारी काढले. आरटीओ कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ३३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाच्या सांगता सामारोहानिमित्त रिक्षा आणि बाईक रॅलीचे लुईसवाडी येथे आयोजन केले होते. या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.    

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षेची जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, प्रसाद नलवडे, अशोक खेनट, गणेश पाटील, लेखाधिकारी अपर्णा पाटणे आणि  ठाणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. अश्विनी पुढे म्हणाल्या की, वाहन चालविणे हे एक प्रकारचे युद्ध आणि कौशल्य असते. गाडी चालविण्याची भीती आणि धडपड आपणही अनुभवत आहे. ठाण्यातील अबोली रिक्षा चालक महिलांबरोबर रिक्षातून प्रवास करण्याची संधी मिळाली. सर्व नियम पाळून रिक्षा चालवितांना त्या आपले कुटूंब चांगल्या प्रकारे सांभाळतात. तशाच त्या स्वत:च्या पायावरही उभ्या आहेत. आरटीओकडूनही त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य मिळते. अनेक अपघातांच्या वेळी आरटीओ अधिकारी कर्मचारी मदतीसाठी धावून येतात. ही निश्चितच अभिमानाची बाब असून असे भाऊ पाठीशी उभे असतील, असंख्य अबोली स्वत:च्या पायावर उभ्या राहतील आणि त्या बोलक्या होतील, असेही त्या म्हणाल्या. चालकांनी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे  आवाहन करून महिलांना सुरक्षितपणे प्रवास करण्याची हमी देणाºया आणि त्यासाठी ऑटोरिक्षाचे सारथ्य करणाऱ्या उपस्थित अबोली रिक्षा चालक महिलांचे त्यांनी कौतुक केले. 

ठाणे नविन आरटीओच्या वतीने लुईसवाडी येथून आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये ५० दुचाकी, ३० अबोली रिक्षा, मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची २५ वाहने आदींचा सहभाग होता. लुईसवाडी येथून नितीन कंपनी- कॅडबरी कंपनी-पोखरण रोड नंबर-उपवन तलाव-टिकुजिनी वाडी रोड आणि माजीवडा मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय, लुईसवाडी येथे आल्यानंतर या रॅलीची सांगता झाली.

Web Title: Accident victims get immediate help from RTO, Ashwini Mahangade said proudly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.