बनावट नोटा घरी बनविणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दापाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:21 PM2018-07-09T19:21:28+5:302018-07-09T19:23:10+5:30

किरकोळ गुन्ह्यातून उकल झाली मोठ्या गुन्ह्याची 

accuse arrested by police who was making fake currency | बनावट नोटा घरी बनविणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दापाश 

बनावट नोटा घरी बनविणाऱ्याचा पोलिसांनी केला पर्दापाश 

Next

ठाणे - भाड्याचे रूमचे डिपॉझिट परत करण्याबाबत आणि घराची साफ़सफाई कारणेवरून झालेल्या वादात हातातील गावठी काट्याने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशिष शिवकुमार शर्मा (वय - ३० ) या  आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून एक गावठी कट्टा, १५ जिवंत काडतुसे आणि  १ लाख ९ हजार ६५० किंमतीच्या भारतीय चलनातील  ६२४  बनावट नोटा मुंब्रा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे आरोपींना बनावट नोटा घरी बनविणारा अट्टल आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. 

५ जुलै २०१८ रोजी  मुंब्रा पूर्व येथे तलावाजवळील गणेश नगर येथे संजयकुमार  सुखराम  गुप्ता (वय - ३२) याचे आशिष कुमार याने भाड्याचे रूमची रक्कम परत देण्याच्या कारणावरून  आणि घराची सफाई  करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यावरून आशिषने संजयकुमारला मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी संजयकुमार आणि त्याचा परिवार आशिषकडे गेला असताना संतापाच्या भरात आशिषने संजयकुमारला  गावठी कट्याने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच बिट क्रमांक ४ चे पोलीस कर्मचारी एस.डी.सस्कर आणि पोलीस शिपाई  व्ही . के. पाटील यांनी मुंब्रा पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आरोपी आशिषला राहत्या घरातून अटक करून त्याच्याकडील एक गावठी गावठी कट्टा, १५ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. आरोपी आशिषने भारतीय चलनातील बनावट नोटा घरी तयार करीत असून नोटांच्या देवाण- घेवाणासाठी, स्वसुरक्षेसाठी त्याने उत्तर प्रदेशातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे आणल्याची कबुली पोलिसांना दिली.या प्रकरणी आरोपीकडून नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले स्कँनर्स, प्रिंटर्स, कातर, पेन,भारतीय चलनाच्या  २०००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या १ लाख ९ हजार ६५० किंमतीच्या ७२४ नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत. 

Web Title: accuse arrested by police who was making fake currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.