४ वर्षांपासून बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला हरिद्वार येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:19 PM2024-08-16T14:19:01+5:302024-08-16T14:19:23+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश.
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा (मंगेश कराळे) :- मागील ४ वर्षांपासून बलात्कार या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला उत्तराखंडच्या हरिद्वार येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी शुक्रवारी दिली आहे.
नालासोपाऱ्याच्या यशवंत गौरव परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर आरोपी अनिल बिडलान याने १६ जुलै २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एकटी घरी असताना तोंड दाबून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी पोलीस आयुक्तालयातील गंभीर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना व आदेश दिला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी हा उत्तराखंडच्या हरिद्वार येथे आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपी अनिल बिडलान याला हरिद्वार येथून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलीस हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोउपनिरी उमेश भागवत, पोहवा अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, बागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.