अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी, ठाणे विशेष न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:10 AM2021-03-19T07:10:07+5:302021-03-19T07:10:45+5:30
याच प्रकरणामध्ये मंगेश कांबळे याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी १८ मार्च २०२१ रोजी ठाणे न्यायालयात झाली. त्यावेळी पीडित मुलीसह सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली.
ठाणे: एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या मंगेश कांबळे ऊर्फ पठाण (३५) याला ठाणे सत्र न्यायाधीश एस.बी. बहाळकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरी, तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाचीही शिक्षा सुनाविली आहे. (Accused of abusing a minor girl sentenced to 10 years hard labor, Thane Special Court orders)
मीरा रोड पूर्व भागातील एनजी वूड पार्क इमारतीच्या तळमजल्यावर, तसेच कांदिवली पूर्व भागातील क्रांतीनगर येथे १९ सप्टेंबर २०१५ रोजी मंगेश याने या पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १९ सप्टेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणामध्ये मंगेश कांबळे याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी १८ मार्च २०२१ रोजी ठाणे न्यायालयात झाली. त्यावेळी पीडित मुलीसह सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली.
सर्व साक्षीपुरावे ग्राह्य धरून आरोपी मंगेश याला कलम ३७६, ३५४-अ आणि पोस्को कायद्यांतर्गत दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साध्या कैदेची शिक्षाही सुनाविली. पीडितेला नुकसानभरपाईपोटी यातील दंडाची रक्कम ही कलम ३५७ अंतर्गत देण्याचे आदेशही ठाणे न्यायालयाने दिले.