महिलेवर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 04:19 AM2020-02-06T04:19:35+5:302020-02-06T04:19:57+5:30
मीरा रोड : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या पीडितेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस ठाणे न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ...
मीरा रोड : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या पीडितेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य टाकणाऱ्या आरोपीस ठाणे न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिसेंबरमध्ये या आरोपीच्या अन्य एका साथीदाराने पीडितेच्या अल्पवयीन भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला आधी अटक केली होती.
२६ वर्षीय पीडित महिला स्वत:च्या दोन व बहिणीच्या दोन अशा चार मुलांना सोबत घेऊन काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहते. मीरा रोडच्या नयानगरमध्ये राहणारा आरोपी इशरत अली ऊर्फ सोनू (३२) याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा १९ जानेवारी रोजी काशिमीरा पोलिसांनी दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेला सोनू गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेस धमकावत होता.
गेल्या शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही महिला हाटकेश-घोडबंदर रोडने घरी जात असताना सोनू व त्याच्या साथीदाराने तिच्यावर रॉकेल किंवा पेट्रोलसारखे ज्वालाग्राही द्रव्य ओतले. शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री सोनूला अहमदाबाद येथून अटक केली.ठाणे न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. घटनेच्यावेळी सोनूसोबत असलेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा नयानगर, एनजी प्लाझामधील सोनूच्या हॉटेलात नोकरीला होता. त्यामुळे त्यांचा परिचय होता. नवºयाने तलाक दिल्यावर महिलेस लग्न करण्याचे आश्वासन देऊन सोनू तिच्यासोबत राहायचा. तिच्याकडे सोनूसोबत येणाºया तौसिफ शेख (रा. भारती पार्क, मीरा रोड) याने महिलेच्या तेरावर्षीय अल्पवयीन भाचीसोबत बळजबरीचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी पोलिसांनी पोक्सोचा गुन्हा दाखल करून तौसिफला २३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता. १ फेब्रुवारी रोजी त्याची जामिनावर सुटका झाली. वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सोनूच्या पत्नी आणि महिलेचा वाद
सोनूने महिलेस लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. सदर बाब सोनूच्या पत्नीला समजल्यावर दोघींमध्ये वाद झाला. दोघींनी एकमेकींविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या. महिलेच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलिसांनी १९ जानेवारी रोजी सोनूविरोधात बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.