हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील गुन्हेगार संचित रजा मिळताच फरार
By धीरज परब | Published: October 27, 2023 10:05 AM2023-10-27T10:05:44+5:302023-10-27T10:05:54+5:30
धीरज परब मीरारोड - भाईंदर येथील २०१४ सालच्या हत्या व हत्येचा प्रयत्नच्या गुन्ह्यातील गुन्हेगार विक्रम उर्फ विकी घाटगे कारागृहातून ...
धीरज परब
मीरारोड - भाईंदर येथील २०१४ सालच्या हत्या व हत्येचा प्रयत्नच्या गुन्ह्यातील गुन्हेगार विक्रम उर्फ विकी घाटगे कारागृहातून संचित रजा मिळताच फरार झाला आहे . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
भाईंदर पूर्व भागात २०१४ साली झालेल्या हत्या , हत्येचा प्रयत्न प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात विक्रम उर्फ विकी घाटगे रा . इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स , नवघर गाव मागे , भाईंदर पूर्व ह्याला पोलिसांनी अटक केली होती . २४ ऑक्टोबर २०१९ रोजी ठाणे न्यायालयाने त्याला जनपठेपेची शिक्षा ठोठावली आहे .
घाटगे हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे . घाटगे याच्या अर्जा वरून छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती विभाग येथील कारागृह उपमहानिरीक्षक यांनी १२ सप्टेंबर रोजी त्याला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली होती.
त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी त्याला संचित रजेवर सोडण्यात आले होते . मात्र २१ ऑक्टोबर पर्यंत घाटगे हा कारागृहात हजर न झाल्याने कारागृहाचे रक्षक महेंद्र पाटील यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत .