लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:54 AM2024-09-25T06:54:17+5:302024-09-25T06:54:26+5:30

काही बेपत्ता आराेपींचा शाेध घेतला जाणार आहे. ते सापडल्यावर त्यांचे जबाब नोंदवले जातील.

Accused Akshay Shinde sexual assault case will be closed | लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार

लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार

ठाणे : पोलिस चकमकीत आराेपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यामुळे व तोच या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याने न्यायालयात अबेटेड समरी दाखल करून हे प्रकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील काही बेपत्ता आराेपींचा शाेध घेतला जाणार आहे. ते सापडल्यावर त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र प्रत्यक्ष लैंगिक अत्याचाराच्या घटनेशी त्यांचा संबंध नाही, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

अक्षय शिंदे याच्या चकमकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. आराेपीच्या चेहऱ्यावर न्यायालयात नेताना काळ्या रंगाचा बुरखा हाेता; कारण जमाव प्रक्षाेभक हाेता. काहीजण त्याच्यावर ॲसिड फेकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने ती खबरदारी घेतली होती.

काळा बुरखा नव्हता

सोमवारी तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणताना अक्षयच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घातला नव्हता. त्याची गरज नव्हती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस कोठडीमध्ये अक्षयला मारहाण झाल्याचा त्याच्या वडिलांचा आराेप पोलिसांनी फेटाळून लावला. बेपत्ता संस्थाचालकांचा गुन्हा तुलनेने गंभीर नाही; त्यामुळे जेव्हा त्यांचा तपास लागेल तेव्हा केवळ त्यांचे जबाब नोंदवले जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Accused Akshay Shinde sexual assault case will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.