आंध्रात एक कोटीचा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल आरोपीस ठाण्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 08:30 PM2018-03-20T20:30:07+5:302018-03-20T20:30:07+5:30

दरोडे, खून आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

accused in armed robbery of one crore in Andhra, arrested in Thane | आंध्रात एक कोटीचा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल आरोपीस ठाण्यात अटक

thane

Next
ठळक मुद्देदरोडे, खून, फसवणुकीचे गुन्हेआंध्र पोलिसांनी जाहीर केले होते बक्षीसवागळे इस्टेट गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : आंधप्रदेशमध्ये एक कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेल्या एका अट्टल आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याच्या अटकेवर बक्षिसही जाहीर केले होते.
अनेक गुन्हे दाखल असलेला एक अट्टल आरोपी अग्निशस्त्र विकण्यासाठी ठाण्यातील श्रीनगर भागात येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना सोमवारी मिळाली. त्यानुसार त्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या पथकाने श्रीनगरमधील आयटीआय सर्कलजवळ सापळा रचला. आरोपीच्या संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना त्याला शिताफीने अटक केली. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले. क्षेत्रपाल उर्फ अविनाश कैलास प्रसाद (३५) हे आरोपीचे नाव असून, वागळे इस्टेटमधील इंदिरानगरात राहतो. तो मुळचा उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बिल्लथरारोड तालुक्याचा रहिवासी असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
आरोपीने जुलै २0१७ मध्ये आंध्रप्रदेशातील एका सराफा व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडा टाकल्यापासून तो उत्तरप्रदेशात वास्तव्य करून होता. आंध्रप्रदेश पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला. मात्र त्याचा थांगपत्ता न मिळाल्याने आंध्रप्रदेश पोेलिसांनी त्याच्या अटकेवर २0 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आरोपीविरूद्ध मुंबई आणि ठाण्यातही काही गुन्हे दाखल आहेत. कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा, काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा तर डायघर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

Web Title: accused in armed robbery of one crore in Andhra, arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.