नगरसेवकाच्या मुलाच्या खूनप्रकरणी आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:59 PM2020-09-28T23:59:22+5:302020-09-28T23:59:43+5:30
नगरसेवकपुत्राचा खून : सोन्याचे दागिने, रिव्हॉल्व्हर हस्तगत
ठाणे : संपत्तीच्या वादातून ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या करून पसार झालेला त्याचा सावत्र भाऊ सचिन सर्जेराव पाटील (२६, रा. ठाणे) याला अखेर अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून तीन किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने, गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमालही जप्त केला आहे. या खुनात मदतीसाठी त्याने चालक गौरव सिंग याला दोन लाख रुपये देण्याचीही आॅफर दिली होती.
पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश पाटील (३५) हा स्कूटरसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी कविताने २० सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेले राकेशचे वडील माणिक हे २० सप्टेंबर रोजी त्यांच्या तिसऱ्या पत्नीसह घरी परतले. त्यावेळी घरातील तिजोरी फोडल्याचे त्यांना आढळले. राकेशनेच ही चोरी केल्याच्या संशयातून त्यांनी तशी तक्रारही दाखल केली.
राकेश आणि चोरीस गेलेल्या सोन्याचा समांतर तपास वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दरम्यान, राकेशची स्कूटर माणिक यांचा चालक तसेच सावत्र मुलगा सचिन (माणिक यांच्या तिसºया पत्नीच्या पहिल्या पतीचा मुलगा) याचा साथीदार गौरव सिंह (२७) याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने २३ सप्टेंबरला रात्री गौरवला अटक केली.
मात्र, त्यानंतर पसार झालेल्या सचिन याचा जाधव, उपनिरीक्षक रूपाली रत्ने व कुलदीप मोरे या तीन पथकांमार्फत शोध घेण्यात येत होता. त्याने फोनही वापरणे बंद केले होते. अखेर, उलवे येथे तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर २६ सप्टेंबरला पोलिसांनी त्याला अटक केली. गौरवच्या मदतीनेच संपत्तीच्या वादातून राकेशचा खून केल्याची कबुलीही सचिनने दिली. या खुनाच्या मदतीसाठी गौरवला दोन लाख रुपये देण्याचेही ठरले होते. सचिनला ४ आॅक्टोबरपर्यंत तर गौरवला १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
राके शच्या कपाळावर झाडली गोळी
च्आरोपी गौरव सिंह याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानुसार, राकेशचा सावत्र भाऊ सचिनसह कट रचून २० सप्टेंबर रोजी राकेशला दारू पाजून घरी झोपवले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सचिन याने त्याच्या पिस्तूलमधून राकेशच्या कपाळावर गोळी झाडून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह चादर आणि सोफ्याच्या क व्हरमध्ये गुंडाळून तो वाशी खाडीपुलावरून पाण्यात फेकल्याची कबुली गौरवने दिली.
च्त्यानुसार, याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सचिन आणि गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राकेशच्या मृतदेहाचा वाशी खाडीत अग्निशमन दल आणि रहिवाशांच्या मदतीने अजूनही शोध घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.