बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 05:00 AM2018-03-19T05:00:15+5:302018-03-19T05:00:15+5:30
आईस्क्रीमचे आमिष दाखवून भांडुप येथील एका बालिकेवर शनिवारी लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस ठाण्याच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे : आईस्क्रीमचे आमिष दाखवून भांडुप येथील एका बालिकेवर शनिवारी लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस ठाण्याच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ब्रह्मांडमधील आझादनगर मार्गावर एक पाच वर्षाची मुलगी रडत उभी होती. तेथून मोटारसायकलने जात असताना ठाण्यातील रहिवासी प्रवीण मकवाना यांना ही मुलगी दिसली. त्यांनी विचारपूस केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. मकवाना यांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलगी पोलिसांना तिचा पत्ता किंवा अन्य कोणताही तपशील सांगू शकली नाही. कोणताही पुरावा नसल्याने तिच्या आईवडिलांचा आणि आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसला. आरोपीविषयी ठिकठिकाणाहून माहिती घेण्याचे काम सुरू असताना एका रिक्षाचालकाकडून पोलिसांना ठोस माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुमन नंदकुमार झा (३८) याला अटक केली.
पीडित मुलगी भांडुप येथे घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला आईसक्रिमचे आमिष दाखवून कडेवर घेतले. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर आॅटोरिक्षाने तो ठाण्यातील माजिवड्यापर्यंत आला. त्यावेळी रिक्षाचालकास त्याच्यावर संशय आला. त्याने आरोपीला विचारणा केली असता, बहिणीची मुलगी असून, तिला घरी सोडण्यासाठी जात असल्याचे आरोपीने सांगितले. माजिवडा येथे उतरल्यानंतर दुसºया रिक्षाने तो आझादनगरकडे गेला. तेथील निर्जन झुडपामध्ये अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलीला तिथेच सोडले. मुलीचे आईवडील तिच्या शोधात शनिवारी रात्री भांडुप पोलिसांकडे पोहोचले. ठाणे पोलिसांनी याचा अंदाज घेऊन मुलीची माहिती आधीच भांडुप पोलिसांना दिली होती. भांडुप पोलिसांकडून मुलीच्या आईवडिलांची माहिती मिळताच पीडित मुलीला त्यांच्या हवाली करण्यात आले.
>आरोपीच्या अटकेसाठी चार पथके
आरोपी बेरोजगार असून, तो आधी सुरक्षारक्षकाची नोकरी करायचा, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याची पत्नी लोकांकडे घरकाम करते. आरोपीला १२ वर्षाची एक मुलगी असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके गठित करण्यात आली होती. कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, सहायक पोलीस निरीक्षक कैलाश टोकले, सुजित खरात, व्ही.एच. दुर्वे, वसंत पाटील यांनी आरोपीला अटक केली.