भाईंदर पोलिसांच्या तावडीतून पाळलेला आरोपी सापडला मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:22 PM2021-10-18T19:22:58+5:302021-10-18T19:23:06+5:30
एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात भाईंदर पोलीसांनी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला बुधवार १३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
मीरारोड - भाईंदर पोलिसांच्या तावडीतून बेडीसह गेल्या गुरुवारी पाळलेल्या आरोपी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाणे हद्दीतून रविवारी रात्री पकडण्यात भाईंदर पोलिसांना यश आले आहे.
एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात भाईंदर पोलीसांनी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला बुधवार १३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती . दुसऱ्यादिवशी १४ ऑक्टोबर रोजी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती . गुप्ता याला पोलिसांच्या वाहनातून भाईंदर ला आणण्यात आले . परंतु भाईंदर टपाल कार्यालया जवळ गुप्ताने बेडीसह गाडीतून उडी मारत पळ काढला होता .
पोलिसांच्या तावडीतून बेडीसह आरोपी पळाल्याने भाईंदर पोलिसांवर नामुष्कीची पाळी आली . आरोपीला पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार करत शोधमोहीम चालू केली . पोलिसांना आरोपी गुप्ता हा अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील, निरीक्षक सागर टिळेकर , सहायक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर व विजय नाईक , उपनिरीक्षक किशोरकुमार नेवसे , किरण कदम , अनिल कारे , वैभव धनावडे सह परदेशी , मुल्ला , मुंढे , सानप , कनोजे , बोरसे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला रविवारी रात्री पकडण्यात आले . आरोपी हा सराईत असून त्याने हातातील बेडी कापून काढली होती .