ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मातर प्रकरणातील आरोपीला आलिबाग येथून अटक
By कुमार बडदे | Updated: June 11, 2023 21:04 IST2023-06-11T21:04:22+5:302023-06-11T21:04:35+5:30
आरोपीचे प्राप्त लोकेशनच्या आधारे तेथील लॉज कॉटेजची रात्री ते सकाळी ११ वाजे पर्यंत तपासणी केली असता तो एका कॉटेज मध्ये आढळून आला.

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मातर प्रकरणातील आरोपीला आलिबाग येथून अटक
मुंब्राः ऑनलाईन गेमच्या आड कथित धर्मातर केलेला आरोपी ,बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान (वय २३) याला मुंब्रा पोलिसांनी रविवारी आलिबाग येथून अटक केली. त्याच्या विरोधात कविनगर पोलिस ठाणे गाझियाबाद येथे धर्मांतर कायदा कलम ३,५(१ ) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा तपास करत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय कुंभार आणि त्यांच्या पथकाला मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्य आधारे तो वरळी पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे वरळी पोलीस यांचे मदतीने त्याचा शोध घेतला आसता तो आलिबाग येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिस पथक परस्पर अलिबाग येथे गेले.
आरोपीचे प्राप्त लोकेशनच्या आधारे तेथील लॉज कॉटेजची रात्री ते सकाळी ११ वाजे पर्यंत तपासणी केली असता तो एका कॉटेज मध्ये आढळून आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन संध्याकाळी मुंब्रा पोलिस ठाण्यात आणले..आरोपी शाहनवाज याचे कडे कविनगर पोलिस ठाणे गाझियाबाद चे अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी व पीडित मुलगा यांची २०२१ च्या सुरवातीस Fort Nite या गेमिंग ॲप्लिकेशन वरून ओळख झाली गेम खेळणाऱ्या लोंकाना एकमेकांशी बोलण्यासाठी discod सुविधा च्यां मार्फतीने ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांनीं एकमेकांचे फोन नंबर घेऊन बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर काही दिवसांनी गेम खेळणे बंद केले २०२१ च्या डिसेंबर अखेर valorant गेम खेळण्यास सूरवात केली.Valorant गेम खेळत असताना Ice - Box या टार्गेट च्या ठिकाणीं पोचले असता दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर विषयावर बोलणे झाले व झाकीर नाईक यानी केलेल्या स्पीच वर चर्चा झाली.
आरोपी हा त्याचे राहते घरी असलेल्या कम्प्युटर वरून गेम खेळत होता त्याचे जवळ एक One Plus मोबाईल आहे.आरोपीचे घरी एक I- Pad, कॉम्पुटर आहे. आरोपी चा व्हॉट्स ॲप नंबर असुन ,त्याच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट असून,याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.