खंडणीतील आरोपीने पोलिसालाच चॉपरने हल्ला करण्याची दिली धमकी: एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 08:07 PM2021-03-09T20:07:52+5:302021-03-09T20:09:44+5:30

कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सितापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली.

Accused of ransom threatens police with chopper attack: One arrested | खंडणीतील आरोपीने पोलिसालाच चॉपरने हल्ला करण्याची दिली धमकी: एकास अटक

कोपरी पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरी परिसरात खंडणी उकळणाऱ्या कृतिक उर्फ बंटी सितापराव (१८, रा. पारशेवाडी, कोपरी, ठाणे) याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदारावरच चॉपरने हल्ला करण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कृतिक याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
कृतिक याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी खंडणी उकळल्याप्रकरणी तसेच हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयात त्याला अटक करण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार नितीन चव्हाण हे त्याला कोपरी येथील जिजामाता उद्यानाजवळील गल्लीमध्ये गेले होते. त्यावेळी त्याने अटक टाळण्यासाठी कमरेला काढलेला चॉपर काढून तो हवेत फिरवत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात त्याला प्रतिकार करतांना कृतिक याने त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी गणवेशाचे बटन तोडून शर्टही फाडला. याप्रकरणी चव्हाण यांनी कोपरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि भारतीय हत्यार कायद्याखाली ६ मार्च रोजी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक एच. एम. वाघमारे यांच्या पथकाने त्याला ७ मार्च रोजी अटक केली आहे.
 

Web Title: Accused of ransom threatens police with chopper attack: One arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.