जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या फरार आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक

By धीरज परब | Published: July 24, 2023 03:45 PM2023-07-24T15:45:57+5:302023-07-24T15:46:23+5:30

हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १० वर्षांपासून फरार असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडास गुन्हे शाखेने मध्यप्रदेशमधून अटक केली आहे. 

accused serving life sentence arrested from Madhya Pradesh | जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या फरार आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या फरार आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक

googlenewsNext

मीरारोड - हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना १० वर्षांपासून फरार असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडास गुन्हे शाखेने मध्यप्रदेशमधून अटक केली आहे. 

बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात २००० सालात दाखल हत्येच्या गुन्ह्यात छोटा राजन टोळीचा गुंड सैय्यद आफताब अहमद हसन रा . ७०१ गौरव गॅलेक्सी फेज-२, मीरारोड याला मुंबईच्या शहर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २००७ सालापासून नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असताना २१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१४ अशी ११ दिवसांची संचित रजा त्याला मंजूर करण्यात आली होती. त्या दरम्यान त्याला काशीमीरा पोलीस ठाण्यात रोज हजेरी देण्याचे आदेश होते. 

परंतु तो कारागृहात रजा संपल्या नंतर हजर झाला नाही. या प्रकरणी २०१४ साली काशीमीरा पोलीस ठाण्यात आफताबवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास १० वर्षांपासून फरार असलेल्या आफताबला शोधून काढण्यासाठी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे व पथकाने समांतर तपास चालवला होता. अंमलदार प्रशांत विसपुते यांना आफताब हा रतलाम येथे असल्याची माहिती मिळाली. 

सहायक निरीक्ष पुषराज सुर्वे सह पुष्पेंद्र थापा, समिर यादव, प्रशांत विसपुते यांच्या पथकाने मध्यप्रदेश गाठले. रतलाम पोलिसांच्या सहकार्याने आफताबला रतलामच्या जावरा भागातून १९ जुलै रोजी पकडण्यात आले. आफताब हा नबी अहमद हसन ऊर्फ इरफान मेहदी या नावाने सुद्धा वावरत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशच्या आंबेडकर जिल्ह्यातील दहीयावर सुरापुर तांडा येथील राहणार आहे.  आरोपीला काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 
 

Web Title: accused serving life sentence arrested from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.