ठाणे जिल्हा रुग्णालयातून पळालेला ‘तो’ कोरोनाबाधित आरोपी पुन्हा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:40 PM2020-12-25T20:40:17+5:302020-12-25T20:51:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रु ग्णालयातून पसार झालेल्या कोरोनाबाधित बबलू उर्फ पप्पू राजेश गुप्ता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य
रु ग्णालयातून पसार झालेल्या कोरोनाबाधित बबलू उर्फ पप्पू राजेश गुप्ता (२५) या मोबाईल चोरटयाला ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पप्पू यादव याला एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात ठाणेनगर पोलिसांनी ७ डिसेंबर २०२० रोजी अटक केली होती. त्याची कोरोनाची अँन्टीजेन तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला ११ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास लघुशंकेला जाण्याचा त्याने बहाणा केला. त्यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृहाचा एक्झॉस्ट फॅन उचकटून तेथील मोकळया जागेतून त्याने धूम ठोकली होती. ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुप्ता ठाणे न्यायालयाच्या आवारात आला असल्याची ‘टीप’ ठाणेनगर पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस अंमलदार विक्रम शिंदे, गणेश पोळ, रोहन पोतदार, उमेश मुंढे आणि तानाजी अंबुरे आदींच्या पथकाने ठाणे न्यायालयाच्या आवारातून त्याला २४ डिसेंबर रोजी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.